Monday, 14 October 2013

  
प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात असे नाही
जीव जेवढा आपण लावावा...
तेवढा सर्व लावतात असे नाही
प्रेमासारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आपण जाणतो
पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच असे नाही
कुणीतरी म्हटलय प्रेमामध्ये हातावरील रेषांनाही....
आपल्या वाटा बदलाव्या लागतात, पणत्या वाटा बदलेपर्यंत...
सर्वच थांबतात असे नाही..

Sunday, 1 September 2013

                                                     पूर्णविराम


"करर्र्र्र" दरवाज्याच्या आवाजासकट तो आत आला. मधुचंद्राची रात्र होती त्याची. टिव्हीमध्ये दाखवतात तसा बिछाना सजवलेला नव्हता किंवा टेबलावर दुधाचा ग्लास नव्हता.
सर्वसामान्य माणसाच्या घरातला मधुचंद्र बिछान्याच्या कर्र्रर्र आवाजासकटच साजरा केला जातो.
बिछान्यावर नेहा स्तब्ध बसली होती. शवात आणि विचारांच्या भोवऱ्यात खोल बुडालेल्या माणसात फक्त श्वासाचाच फरक असतो.

प्रसंग आपल्यासोबत घडत असतात. आपण त्या प्रसंगात असूनही त्या प्रसंगाचे भाग नसतो. कधीकधी असं का होतं?
हजर असूनही गैरहजर का असतो आपण? आपल्या उपस्थितीत आपण अनुपस्थित का असावं?
अशीच काहीशी परिस्थिती होती तिची. नेहा तिथे असूनही तिथे नव्हती. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र अमावस्येतल्या मधुसमोर उभा होता.
नेहाच्या मनात एकच कल्लोळ माजला होता.
"आपलं आयुष्य एका क्षणात इतकं बदलावं आणि तेही आपल्याला परवानगीशिवाय !!! मग ह्या आयुष्याला आपलं का म्हणावं?"
ती साडीच्या पदराचे टोक बोटांनी बोटाभोवती गुंडाळत होती. विचारात दुबळी होती. खोल बुडत होती.
"गरिबाने मुलं जन्माला घालूच नयेत. का घालावीत? अजून एक गरीब जगात आणण्यासाठी?
गरीबाचा जगाला एकाच गोष्टीसाठी उपयोग होतो. एखाद्या जातीच्या लोकांचा आकडा वाढवण्यासाठी.
ह्या गरिबीमुळेच मला ह्या वयात लग्न करावे लागले. हे लग्न समीरशी झाले असते तर? तर तेव्हाही मला इतकेच दु:ख झाले असते का?
नाही. तेव्हा ह्या विचाराने मनाला स्पर्शही केला नसता माझ्या.
पण माझं लग्न झालंच नाही समीरशी. का तर म्हणे? इज्जत.
घरात वाटीभरच पीठ उरलेल्या गरिबालाही त्याच्या जवळ असलेल्या वाटीभर इज्जतीची इतकी काळजी?
भरभरून कमावणाऱ्या श्रीमंताला इतकी इज्जत असतानाही त्याची काळजी वाटू नये आणि जग ढुंकूनही पाहत नाही अश्या गरिबाला स्वतःच्या इभ्रतीची इतकी काळजी असावी? का? कशाला? कशासाठी?
आणि ह्या चिमुटभर इज्जतीपायी त्यांच्या मुलांनी स्वत:च्या आयुष्याचे असे हालहाल करून घ्यावेत? अश्या इच्छा माराव्यात?
माणसाने गरीब जन्माला येऊच नये आणि गरीब जन्माला आलाच तर गरीब मरू नये."

विचारांचे वावटळ नेहाला लांब घेऊन जात होते. मधुचंद्राची रात्र सरत चालली होती. चंद्राला पत्ताही नव्हता की, तो उपभोगतोय ते मन नसलेले शव आहे.
शरीरावरचा हक्क म्हणजे मधुचंद्र नव्हे. त्यासाठी मनं जुळावी लागतात. नाहीतर अश्या रात्रीतून फक्त मुलं जन्माला येतात, नाती नाहीत.

वाऱ्याच्या मंद झुळुकेने वेळेचे सगळे लक्ष भूतकाळाकडे नेले. तिला समीर आठवू लागला. समीर. कानात कुजबुजून आयुष्य बहरून गेला तो.
लहानपणीची ओळख प्रेमाकडे कधी झुकली हे कळलंच नाही.
कानात एकदिवशी फक्त म्हणाला, "मला तू आवडतेस."
आयुष्याला कलाटणी देणारा तो दिवस. ते ऐकून कसे लाजून पळत सुटलो होतो आपण. वाऱ्यासोबत पीस कसं उडतं, अगदी तसं. अलगद.
तो क्षण, ती हुरहूर, ती भीती, छातीचे ते ठोके, वाढलेले श्वास...
धावताना रस्त्यात किती जनांना धक्का लागला असेल कुणास ठाऊक.
त्या नंतरच्या त्या रात्री म्हणजे आयुष्याच्या सर्वात सुंदर रात्री. हा चंद्र साक्षीदार आहे त्याचा.
पण नियतीला आपलं सुख पाहवत का नाही?"
एक थेंब नेहाच्या पापण्यांच्या कडेहून गालावरून खाली सरकला. उशीला भिडला. मुरला आणि संपला.
"नेहा, घरचे तयार नाहीत आपल्या लग्नाला."
"तू समजाव न त्यांना."
"मी अजिबात नाही समजावले असे वाटतंय का तुला?"
"समीर..."
त्या हाकेत एक खोल दु:ख होतं, किंकाळी होती.
हवं असलेलं डोळ्यांसमोरून निसटत असताना मारलेल्या किंकाळ्या ज्याच्या त्यालाच ऐकू जातात. समीरने ऐकल्या त्या. पण...
या 'पण' वर कित्येक कथा येऊन संपल्या असतील.

नेहाच्या मनाचा एक कोपरा समीरजवळ धावत जात होता पण साडीचा पदर लग्नातल्या उपरण्याच्या गाठीत अजूनही तसाच अडकून होता.
मनाची एक बाजू समीरला फक्त शाप देत होती.
"समीर, खेळ खेळल्याचे पैसे मिळतात. पण, मनाशी खेळल्याचेही पैसे मिळत असते ना तर तू आज खूप श्रीमंत असतास ना? हे नाते पुढे न्यायचे नव्हतेच तर मग सुरूच का केलेस हे नाते?
दु:ख स्वत:हून नाही येत रे आयुष्यात कुणाच्या. आधी ते सुखाची सवय लावतं आणि मग दिलेलं सुख सोबत घेऊन जातं.
तू का आलास माझ्या आयुष्यात? तू नव्हतास तेव्हा खुश होते मी. सुख नसलं, तरी दु:खही नव्हतं.
आई बाबांना वाटतंय की,चल मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली.
पण त्यांना काय माहित की,
नवीन वाक्य सुरुवात व्हायला आधीचं वाक्य संपावं लागतं. पण काही वाक्य कधीच संपत नाहीत.
ती अशीच सोडली जातात... अर्धवट... माझ्या आणि समीरच्या प्रेमासारखी.
मला माफ कर समीर. पण मी तुला आयुष्यात कधीच माफ करू शकणार नाही."


-----------------------पूर्णविराम (भाग २)--------------------

जमिनीवरचा एक दगड उचलून त्याने असेल नसेल तितका जोर लावून समुद्रात भिरकावला. जणू तो दगड जितका लांब जाईल, तितका त्याचा राग शांत होणार होता. अजब समीकरण होते ते.
पण प्रत्येक वेळेची स्वत:ची समीकरणं असतात आणि ती प्रत्येकासाठी वेगवेगळीच असतात. त्याचं समीकरण सध्या हेच होतं.
त्याला दम लागल्यासारखे वाटत होते. शेवटी तो तसाच त्या वाळूवर बसला, जसे पुन्हा कधी उठायचेच नव्हते तिथून. डोके सुन्न झाले होते. सगळं आठवत होतं. आठवण ही चीजच अजीब आहे. आली तरी त्रास आणि नाही आली तरी प्रश्न.
खरंतर एखादी गोष्ट 'आठवण' बनली याचाच त्रास जास्त होत असतो.

सकाळी काय झालं घरात?
"हे मी तुला शेवटचं सांगतोय समीर. यापुढे हा विषय अजिबात निघता कामा नये घरात. तुझं लग्न तिच्याशी होणार नाही. कधीच नाही. कळलं?"
"पण पपा, माझं काय? प्रेम आहे माझं तिच्यावर. त्याला काहीच किंमत नाहीयेय का?"
"प्रेम!!! हे प्रेम बीम न भूत आहे सध्या तुझ्या डोक्यावर. उतरलं न एकदा की, मग सगळं स्पष्ट दिसेल तुला. किती वेळा सांगितलं तुला? आम्ही तुझं वाईट करू असं वाटतंय का? आमच्या नकाराची कारणं तुला आधीही सांगितलीयत मी."
"समीर पप्पा काय सांगतायत ते काळात नाहीये का तुला? किती वेळा सांगायचे?"
समीरच्या मनात विचारांच्या लाटा येत होत्या. पण वाहून जाता येत नव्हतं. डोळ्यासमोर नेहा येत होती.
"काय कमी आहे तीच्यात? साधी, सरळ, घरातले प्रत्येक काम मन लावून करते, कष्टाळू आहे, प्रेमळ आहे. पण मग हे प्रेम मम्मी-पप्पाना का दिसत नाहीयेय?
ही आपली माणसं!!! आपली माणसं" दोन क्षण तो एकटाच हसला.
"आपलीच माणसं शत्रूसारखी वागू लागली की, त्यांना 'आपलं' कसं म्हणावं? नाती माणसाला सांभाळतात की, बंधनं बनून अडवून ठेवतात?
एखाद्याच्या पोटी जन्माला येणं हा व्यवहार आहे का?
होय व्यवहाराच असणार. नाहीतर जन्माला घातल्याची किंमत मागितली नसती कोणत्याही आईवडिलांनी स्वत:च्या मुलांकडे.
माझं प्रेम, माझं मन, माझ्या भावना यांना काहीच किंमत नाहीयेय का? की त्यांना वाटतंय तेच करायचे मी आयुष्यभर.
स्वत:ला स्वत:च्या आयुष्यात जे काही करता नाही आले, ते पूर्ण करण्यासाठी मुलं जन्माला घातली जातात का?
म्हणजे ज्याला त्याला स्वत:ची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन पिढ्या जगाव्या लागणार. स्वत:च्या पिढीत स्वत:ची स्वप्न कधीच पूर्ण करता येणार नाहीत का?"
तिचा स्पर्श आठवला त्याला. पहिला स्पर्श, थरथरता, घाबरलेला, प्रचंड विश्वासाचा.
एक टपोरा थेंब टपकन गालावरून हातावर पडला त्याच्या.
"वचन दिले होते आपण तिला. पण...
पूर्ण होतं ते वचन, बाकी सगळे फक्त शब्दच... निरर्थक शब्द."

पुन्हा एक दगड उचलून त्याने भिरकावला. आतला राग आत मावतच नव्हता. जोरात ओरडावेसे वाटत होते.
थेट जावे आणि त्याच आईवडिलांचा गळा घोटावा असेही वाटले त्याला.
"का? का? का वागताय तुम्ही असे? चांगली आहे हो नेहा. प्रेम केलंय मी तिच्यावर. तुम्हाला वाटतंय ना की, ती चांगली मुलगी नाहीयेय, पण तरी मी तयार आहे तिच्याशी लग्न करायला.
पुढे काही वाईट झालेच तर मी तुम्हाला दोष देणार नाही. पण लग्न नाही झालं तर मात्र आयुष्यभर दोषी बनाल तुम्ही माझे.
सगळं हवंय मला. तुम्ही, मम्मा आणि हो हो...ती सुद्धा.
हा 'सगळं' हा शब्द इतका मोठा आहे का? की तो फक्त एक काल्पनिक शब्द आहे. जगात कुणालाच भेटला नाहीये हा शब्द अजून."

भरलेलं मन डोळ्यांतून वाहूनही संपत नव्हतं.
खिशातला मोबाईल सारखासारखा वाजत होता. कोणाचा फोन आहे पाहण्यासाठी समीरने मोबाईल डोळ्यांसमोर धरला.
'स्वीट होम' असे नाव होते. फोन घरूनच होता. तो स्वीट होम शब्द वाचून तो एकटाच हसला आणि पुढच्याच क्षणी मनात रागाची एक मोठी लाट आली.
हातातला मोबाईल तसाच त्या दगडासारखा समुद्रात फेकून द्यावा. फक्त मोबाईलच नव्हे, स्वत:लाही तसेच त्या लाटांमध्ये झोकून द्यावे असे वाटलं त्याला.

"स्मशानभूमीकडे नेताना शवाच्या मागे जितकी गर्दी असते ना, तितकी त्या व्यक्तीची इज्जत असते.
मेल्यानंतरच्या या इज्जतीसाठी माणूस जिवंतपणी जिवंत शरीरातल्या, एक संवेदनशील मन असलेल्या स्वत:च्या माणसांच्या कित्येक इच्छांचा खून करतो. अश्या खुणांना शिक्षा का नसते?"
प्रश्नावर प्रश्न. ते ही स्वत:लाच.
बराच वेळ वाजणारा फोन शेवटी त्याने कंटाळून उचलला.
"समीर, अरे किती वेळ झाला? आहेस कुठे तू? घरी कधी येणार आहेस?" पलीकडून आईचा आवाज होता.
"येईन. वाटलं की येईन. आता कसलीही घाई नाही राहिलीय मला. तू नको काळजी करूस."
ठेवला त्याने फोन. तसाच स्विच ऑफ करून टाकला.
उठला घरी जायला. उठता उठता अंगात जोर नसल्यासारखा पुन्हा त्याच वाळूत धडपडून पडला.
स्वत:वरच हसला आणि पुन्हा उठला घरी जाण्यासाठी.
रस्ता तसाच गजबजलेला होता. लोकांना कुठे माहित होतं की, याच्या मनात काय चाललंय? आणि माहित असतंच तर कोण काय करू शकणार होतं? जिथे स्वत:च्या आई-वडिलांनी साथ नाही दिली तिथे जगाकडून काय पेक्षा ठेवणार?
त्याचे पाय अंतर कापत होते पण, तो मात्र मागेच रेंगाळत होता. त्याच वाळूपाशी, त्याच आठवणींपाशी.
रस्त्यात मंदिराजवळ पोचला. मंदिरात घंटा वाजत होत्या. पण देवावर इथे कोणाचा विश्वास होता?
"देव!!! हाहाहा जोक आहे हा मोठा. सर्वात मोठं खोटं. हाहाहा. वेडे आहेत सगळे. उगाच पाया पडतात."
मनातले मनात बडबडत तो तसाच यंत्रवत गाभाऱ्यात गेला. भिजलेल्या शर्टाने चेहरा फुसून तसाच त्याच मूर्तीपुढे हात जोडून मनातल्या मनात म्हणाला,
"तिला सुखात ठेव. बस. बाकी काही नको मला."
हुंदका फुटायच्या आता तो तसाच निघाला मंदिरातून.
जग स्वत:च्या नादात होतं. त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. अगदी त्याचं स्वत:चंही.
"ओ बाई घ्या की, अहो चांगली आहे भाजी."
"पांच का दो, पांच का दो"
"अबे आज बाईंनी कसला फटकावला ना त्या जोश्याला, भारी धमाल."
"प्लाटफ़ोर्म क्रमांक १ वर येणारी गाडी...."
"ऑनड्यूटी पुलिस स्टेशन मास्तर के कार्यालय में आईये"
आजूबाजूला फक्त आवाज घुमत होते. गोंधळ होता. पण मनाच्या गोंधळात बाहेरचा गोंधळ ऐकू कुठे येतो?
"दिखता नही क्या? आंखे फुट गयी क्या साले? देख के चल भाई"
लागलेल्या धक्याने तो भानावर आला.
कोणत्या तरी ट्रेन मध्ये जाउन बसला. कितीची ट्रेन? कुठे जाते? कुठे थांबणार? कसली ही काळजी नव्हती त्याला. कारण त्याला कुठे पोहोचायचंच नव्हतं.
अश्याच एक सीटवर जाऊन तो शांत बसला. तीच शून्य नजर आणि मनात तोच एक मोठा शून्य घेऊन.
विचार पाठलाग सोडत नव्हते. ट्रेनमधल्या डोक्यावरच्या बंद पंख्यामध्ये एक गृहस्थ कंगवा घालून तो चालू करण्याचा प्रयत्न करत होता.
त्याच्याकडे पाहून समीर मनात म्हणाला,
"आयुष्यातली खूप माणसं असतात. ह्या ट्रेनमधल्या पंख्यासारखी. पण त्यातली काही काहीच कामाची असतात. बाकी सगळी अशीच बिनकामाची. न चालणाऱ्या ह्या पंख्यासारखी. कोणच येत नाहीये माझ्या मदतीला. कुणी तरी या ना यार." खिडकीच्या लोखंडी जाळीवरची त्याची पकड रांगणे घट्टच होत चाली होती.
ट्रेनच्या एका दरवाज्यावर एक जोडपं गप्पा मारत उभं होतं. त्यांना पाहून तो मनातल्या मनात म्हणाला, "अरे, असे फिरू नका सगळ्यांसमोर. नजर लागेल तुम्हाला या जगाची.
खरं सांगतोय मी."
समोरच्या सीटवरती एक लग्न झालेलं जोडपं आपल्या लहान मुलाला घेऊन बसलं होतं. त्या मुलाची आई त्या मुलाला खेळवत होती.
आपल्या बाळाला गाल फुगवून हसवत होती. तेच फुगवलेले गालचे फुगे स्वत:च्याच मुठीने खोटे खोटे फोडत होती. मधेच वेडेवाकडे चेहरे करत होती. वेगेवेगळे आवाज काढत होती. बाप बाजूला बसून हसत होता. आजूबाजूचे लोक ही त्यांना पाहून कौतुकाने हसत होते.
समीरही दोन क्षण हसला त्यांना पाहून.
पण पुढच्याच क्षणी मनात म्हणाला,
"बाळा, अरे हसू नको जास्त. हे आईवडील जे तुला हसवत आहेत ना, ते उद्या त्या हसवण्याची किंमत मागतील तुझ्याकडे आणि ती किंमत तुला तुझ्या आयुष्यातली सर्वात आवडती गोष्ट देऊन फिटवावी लागेल. नको हसू."
कोणतं तरी स्टेशन आलं, गाडी स्लो झाली म्हणून आणि समोरचं दृश्य असह्य झालं म्हणून समीर उठला आणि दरवाज्याजवळ जाऊन उतरण्यासाठी उभा राहिला.
पुन्हा लक्ष त्या बाळाकडे गेले ते त्याच्या रडण्याने. खेळता खेळता बाळ सीटला थोडेसे आपटले होते आणि जोरात रडत होते.
त्या बाळापेक्षा त्याच्या आईचे डोळे जास्त वाहत होते. बाळाच्या गालाचे भरभर मुके घेऊन घेऊन ती सारखी त्याला समजावत होती. सीटवर हाताने फटके मारून सांगत होती,
" हे बघ, हे बघ. कसे फटके मारले मी. माझ्या बाळाला मारतो काय!! हटट...हटट... मारले हा मी त्याला. ललायचं नाही आता. शहाणं आहे ना बाल आमचं!"
गालावरच्या आसवांना घेऊन बाळही आईकडे पाहून हसू लागले आणि त्याची आई सुद्धा.
समीर सर्व पहात होता. बाजूच्या काकांना त्याने विचारले, " काका, स्टेशन कोणतं आलंय? गाडीचा लास्ट स्टोप कोणता?"
"ठाणा गाडी आहे रे. कुर्ला आलंय आता."
स्विच ऑफ केलेला मोबाईल त्याने चालू केला. मोबाईलवर घरून आलेले १२- १५ मिस-कॉल होते.
त्याने घरी फोन केला.
"हेल्लो, समीर अरे आहेस कुठे? आणि फोन का बंद ठेवलास बाळ? ये रे घरी लवकर. जेवायचे थांबलोय आम्ही. वाट पाहतोय तुझी. ये हा लवकर." आईचा आवाज काळजीने भरलेला होता.
"ह्म्म्म." हुंकार देऊन त्याने फोन ठेवला.

नेहा समीरला कधी माफ करू शकेल का? समीर तरी स्वत:ला माफ करू शकेल का? आईवडिलांना माफ करू शकेल का? दोष कुणाला द्यायचा? माफ कोणाला करायचे आणि कोणी करायचे?
अश्या कित्येक कथा आजवर घडल्या असतील. अजून एक कथा आज संपली होती. संपली नव्हती, संपवली गेली होती.
आयुष्याचे कित्येक पूर्णविराम आपल्या हातात नसतात. नियती ते पूर्णविराम न सांगता, न बोलता नकळत आयुष्याच्या एखाद्या वाक्यामध्ये आणून ठेवते.
या पूर्णविरामाने काही वाक्य अर्धवट राहतात, काही पूर्ण होतात.
पूर्णविरामापुढेही आयुष्य बरंच बाकी असतं. मागची अपूर्ण वाक्यं पुढचे शब्द गिळून नवीन वाक्य सुरूच करू देत नसतात.
पण...
आयुष्य कधीच थांबत नाही. ते वाहत राहतं.
आयुष्यात आलेल्या पूर्णविरामाला अल्पविराम मानून थोडासा विसावा घेऊन पुन्हा पुढे चालत जायचं... पुढच्या पूर्णविरामाला भेटण्यासाठी.

Friday, 30 August 2013

तू समजुन का घेत नाही..........
कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !
इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस,
भावना का माझ्या तुला जाणवत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला करमत नाही !
तू दुर असलीस की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ
नाही !
कधी कधी असं वाटतं,
तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!
न भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !
आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!
तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,
हा काही आज उद्याचा खेळ नाही !
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!
किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तू हे समजुन का घेत नाही !!

Monday, 26 August 2013

१) रोज दहा ते तीस मिनिटे मोकळ्या हवेत चाला आणि हो! अगदी सुहास्यवदनाने.
२) रोज किमान दहा मिनिटे स्तब्ध…शांत राहा. एका जागी! शांत!
३) रोज ७ तास शांत झोप काढा. शांत झोप…सुखाचा मूलमंत्र!
४) जगताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, स्फूर्ती, उत्साह आणि दिलदारी.
५) रोज थोडे तरी खेळा. मनोविनोदन होईल.
६) गेल्या वर्षापेक्षा मी थोडीतरी अधिक पुस्तके वाचीन असा निश्चय करा.
७) खूप मुबलक पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन!
८) फळे, फळभाज्या, पालेभाज्या असे शेतातले, बागेतले, डोंगरावरले पदार्थ रोज पोटात जाऊ देत. थोडे समुद्रातलेही! तन सुखी तो मन सुखी!
९) जरूर लक्षात घ्या की सकाळचा नाश्ता राजासारखा, जेवण राजकुमारासारखे नि रात्रीचे जेवण मात्र भिकाऱ्यासारखे असावे! म्हणजे काय राव? नाश्ता दमदमीत. दुपारची जेवण राजस; पण रात्रीचे जेवण मात्र अगदी अगदी थोडे, पुरते तेवढेच. कारण झोपेत कुठलीच शारीरिक हालचाल नसते.
१०) रोज ध्यानधरणा करा. प्रार्थना करा. आपल्या धावपळीच्या, दगदगीच्या जीवनांत तेच एक इंधन आहे जे सुख-शांती-समाधान देईल.
११) जागेपणी स्वप्न बघा. त्याचा ध्यास घ्या. त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा.
१२) खूप आनंदी राहा. हसून खेळून, मिळून मिसळून! आप चंगा… तो जग चंगा.
१३) एक नियमच करून टाका. रोज मी किमान तीन लोकांच्या ओठांवर स्मितहास्य फुलवेन.
१४) आपले चैतन्य, आपली बहुमोल ऊर्जा लोकांबद्दल वायफळ बोलण्यात, त्यांची कुचेष्टा करण्यात वाया घालवू नका.
१५) ज्या गोष्टी आपल्या अखत्यारित नाहीत, ज्या परिस्थितीस तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल दुःख करीत बसू नका. त्यापेक्षा माझे वर्तमान कसे सुधारता येईल, ते पहा.
१६) ७० वर्षांवरील वृद्ध माणसे आणि ६ वर्षांखालील छोटी मुले यांच्यासमवेत दिवसातील थोडातरी वेळ नियमित घालवा. वृद्धांना जगण्याची उमेद द्याल नि छोट्यांकडून ऊर्जा घ्याल!
१७) हे जीवन फार छोटे आहे. दुसऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करण्याइतके खचितच मोठे नाही.
१८) स्वतःचा फार गंभीरपणे विचार करू नका. इतरांना तुमची काही पडलेली नाही. ते तुमचा इतका विचार अजिबात करीत नाहीत.
१९) भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. आपल्या जोडीदाराला त्याच्या भूतकाळातील चुकांसाठी टोकणे, चटकन लागेलसे बोलणे, टोचत राहणे सोडून द्या. त्यामुळे आपला जोडीदार पुन्हा पुन्हा दुखावला जाईल आणि आपले वर्तमान बिघडेल. त्याचे काय हो! सो? लॉक द पास्ट, एन्जॉय द प्रेझेंट!
२०) रोज विद्यार्थी शाळेत जातात. जीवन ही आपली शाळा समजा. एनी प्रॉब्लेम? अहो तो बीजगणिताचा तास समजा. एखादा प्रॉब्लेम नाही सुटला तरी तास संपतो! संपते ना? पण त्यातून आपण काहीतरी धडा शिकतोच! तसेच जीवन आहे. काही समस्या सुटत नाहीत; पण त्यातून मिळालेल्या धड्याने आपण शहाणे होतो हेही नसे थोडके!
२१) प्रत्येक वेळी तुम्हीच कसे जिंकणार? इतरांनाही थोडी संधी द्या ना!
२२) दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना नको. त्याचे वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होऊ नका. तो आतून काय 'भोगतोय', काय 'सोसतोय' ते तुम्हास कोठे ठाऊक आहे?
२३) क्षमाशस्त्र ज्याचे हाती त्यास काय तोटा? आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा!…क्षमाशील झालात की सुखाची रांगोळी आपल्याच दारात!…
२४) दुःखाचे, तणावाचे दिवस आहेत? संपतील राजा! परिस्थिती कायम बदलत राहाते. लाल सिग्नल नंतर हिरवा येतोच की!
२५) तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे! हे धरा मनी. पहा… कसे आशादायी नि प्रसन्न वाटेल.
२६) तुमचे कुटुंब तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. त्यांना प्राधान्य द्या.
२७) काय वाटेल तो पसंग येवो! धैर्य सोडू नका. उठा, उत्तम वेश परिधान करा व धैर्यांने जगास सामोरे जा.
२८) तुमचा आत्मा सुखी आहे! मग तुम्ही दुःखी? का? कशासाठी? सुखी राहा.
२९) हे सारं आवडलं ना? मग आपल्या आवडत्या मित्रांना कळवा जरूर! मला हा सुखाचा संदेश माझ्या आवडत्या मित्रानेच पाठवलाय जो मी आवडत्या वाचकांपर्यंत पोहोचविलेला आहे! बी हॅप्पी!!!!!

Friday, 23 August 2013

शोना माझे हे पत्र आज तुला काही सांगणार आहे
जे तू कधी ऐकले नाहीस
ते तुझ्या डोळ्यां समोर उघडणार आहे

कधी तरी कळेल तुला
तू तेव्हा तरसशील
खोटे म्हणणाऱ्या ह्या प्रेमाला तू खरच तेव्हा ओळखशील

प्रेम खरच असता रे तुला आज नाही समजलं
गर्दीत हरवला आहेस तू
अन त्यात तू मला हि गमावलंस

म्हणायचास न तूच मी प्रेम मनात नाही
पण वेळ येईल तुला तेव्हा मीच कुठे सापडणार नाही

रडशील तेव्हा तू मला आठवण करून
पण तेव्हा मला हि तुझ्या डोळ्यांत प्रेम पाहता येणार नाही

मला खरंच तू हवा होतास रे
जाणून का घेतलं नाहीस
ओल्या माझ्या हृदयाला मिठीत का सुखावलं नाहीस

आता खूप वेळ झाली शोना
मी दूर निघून आली
माझे अस्तित्वच मी तुझ्या जवळ विसरून आली

माझे हे पत्रर वाचून शोना डोळे भरू देऊ नकोस
प्रेम केलंय रे तुझ्यावर मी
तुझ्याच सोबत असणार जेव्हा मला आठवशील
तुला बंद डोळ्यांनीहि मी समोर सापडणार ...

मला खरंच तू हवा होतास रे .....
फक्त तू हवा होतास .....
का रडतेस..??
का रडतेस आता आणि कशासाठी..??

तेव्हा तर हसत हसत,
मला दूर केले..
मग आता रडून दाखवून,
तू काय सिध्द केले..??

जेव्हा मला खरी गरज होती..
तेव्हा मला तर एकट्यालाचं सोडले..
मात्र तुझ्या सोबतीला कोणीतरी होते..
म्हणून तू मागे वळून नाही पाहिले..

आता मला सवय लागली आहे..
तुझ्याशिवाय जगण्याची..
मग तू का आस लावली आहेस..
माझी परत होण्याची..??

नको रडून मजबूर करूस..
मला परत येण्यासाठी..
कारण..!!
आता मी पुन्हा येणार नाही ते दुःख सोसण्यासाठी..

आता मी पुन्हा येणार नाही ते दुःख सोसण्यासाठी..

Wednesday, 21 August 2013

तू नाही दिलास reply
मला काही वाटणार नाही
तू नाही उचललास phone
मला यातना होणार नाहीत कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू विसरलास मला
मी तुला विसरणार नाही
तू रडविलेस जरी मला
तरीही मी रडणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे कि तुला सर्व माफ आहे...

तू सोडून गेलीस  मला
तरी मी वाट पाहणार अखेरच्या श्वासापर्यंत फक्त
तुझाच  अन तुझाच  राहणार कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
कि तुला सर्व माफ आहे...........!

Tuesday, 20 August 2013

पहिलं प्रेम कसं विसरायचं ?
तू गेल्यावर...
शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात....!!
तू गेल्यावर....
मजा मी एकटा गप्प बसून राहतो
तू येणार्या क्षणांची आतूरतेने वाट पाहतो....!!
तू गेल्यावर....
आजही आठवते मला तुझे-माजे ते सरते दिवस
पौर्णिमेच्या रात्री आभाळ आल्यावर चांदण्याना वाटते जशी अमावस.....!!
तू गेल्यावर....
आता फक्त मी शब्दाना चालत राहतो
जुनेच शब्द पुन्हा घेऊन कविता करत राहतो....!!
तू गेल्यावर.....
आता मज मला राहत नाही स्मरण
इतका अभागी तुझ्याशिवाय मी वाट पाहता तुझी येतही नाही मरण....!
किती दिवस Gf मुळे जरा अस्वस्थ होतो...काळजी वाटत होती.
पण कळलं कि तिचा नविन Bf आहे आता.....थोड दुःख वाटलं...
पण समाधानही वाटलं की लवकर मोकळा झालो...आता जबाबदारीतुन मोकळा झालोय....
त्यामुळे प्रेमाचा खेळ आता बसझाला.....कितीपण मनापासुन प्रेम केलं
तरी कुठेतरी ते कमीच पडतं......असो....शेवटी नशिब...Gf ने दगा केला 
म्हणुन आत्महत्या करणे,दारु पिणे यातला मुलगा मी नाही....जगायचं आहे ते आईवडीलांसाठी...
त्यांचे उपकार कधीच फेडु शकतनाही...तशी त्या उपकारांची किंमत
कशातही मापु शकत नाहि...सगळं करा पण आईवडिलांना कधी दुखवु नका......
प्रेमासाठी आयुष्य पडलंय...प्रेम हे आयुष्य नाहि.....सगळं मनापासुन खरं बोलतोय...हवं तर
पकाव समजा...
पण भावनेच्या भरात जाऊन कोणताहि निणँय घेऊ नका...भविष्यात
जी व्यक्ती तुमची जोडीदार बनेल (नवरा/बायको) तीला मनापासुन स्विकारा..
जे प्रेम तुमच्या Gf/bf ला कमी पडलं तेच प्रेम त्या व्यक्तीवर करुन तीला कधी स्वतःपासुन दुर करु नका...
आयुष्यात उतार चढाव येतातच...रागाच्या भरात काहि करण्यापेक्षा शांत
डोक्याने आलेल्या परिस्तिथिला तोंड द्यायला शिका.....मीपणा अहंकार सोडुन
नम्रपणे जीवन जगायला शिका....स्वतःची चुक मान्य करुन दुसरयाला माफ करायला शिका 
उद्याचा दिवस तुमचाच असेल..........

Saturday, 17 August 2013

तू बरोबर असतेस तेव्हा,खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,खूप खूप हसावसं वाटत,
नाहीतर उदास रहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,

नाहीतर मनात सगळं दुखं,दाबून ठेवावस वाटत...


तू बरोबर असतेस तेव्हा,तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,

नाहीतर खिडकीतूनच,पडता पाऊस पाहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,जगावसं वाटत,
नाहीतर जग सोडून जावस वाटत...


तू बरोबर असतेस तेव्हा,फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,

नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...!

Wednesday, 7 August 2013

जगाचं जेवढं.....आयुष्यमान असेल....
असं प्रेम कधीच...जगानं पाहिलं नसेल....
इतकं कुणी कुणाला....वेड लावलं नसेल....
इतकं अलगद काळीज.....कुणी चोरलं नसेल....
नुसत्या गोड हसण्यानं.....इतकं कुणी फसवलं नसेल....
खंर प्रेम कळत असूनही...इतकं कुणी रडवलं नसेल....

खोट्या नजरेने प्रेम जडवलस,,,,,आणि आयुष्यभरासाठी रडवलस....

Tuesday, 6 August 2013

आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!
१)आपला पहिला पगार आपल्या आई
वडिलांना देणे...!!!
२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात
पाणी आणून
करने...!!!
३)जुने फोटो बघून आठवणीत रमून
हसणे...!!!
4)हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत
मारणे...!! !
५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम
करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात
घेवूनचालणे...!! !!
६)जे आपली मनापासून काळजी करतात
त्यांच्या कडून
एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!
७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या क
चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!
८)असा क्षण
जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत
घेते आणि आपल्याला अश्रू आवरत
नाही....!!
विसरून जा असे कसे म्हणू,
आठवणीत तर तुझेचं अश्रू वाहतात..
परत ये असे कसे म्हणू,
तुला आपलेसे केले नाही ह्याची खंत
बाळगतात..
तू तुझे अस्तित्व सारे मनाचा कुपीत
लपवलं आहे,
अखेरचा क्षणीही माझ्या शिवाय
सारे तुला शोधतायत..
आज खोल गेलेल्या डोळ्यात तुझे फुल
पडले,
तेव्हा कळले तुझ्या शेजारीचं माझे
शरीर गाडले..
आता शांत निवांत पडलो आहे,
तू येण्याची वाट पाहत आहे..

Collection