Friday, 2 August 2013

My first blog



कशी समजूत घालू माझ्या वेड्या मनाला तू नाही आता जवळ सांगू कुणाला

दिवसातून कितेकदा पाहतो तपासून मोबाइला नाही येणार तुझा आता फोन सांगणा माझ्या वेड्या मनाला

कसे विसरावे गोडवा तुझ्या मिठीतला अजूनही तुझी आस माझ्या वेड्या मनाला

तुझे ते गोजिरवाणे हसणे आठवे माझ्या वेड्या मनाला मी मात्र विसरलो आता गालातल्या गालात हसण्याला

आस तुझ्या प्रीतीची लागली आता जीवाला अजून किती घायाळ करी माझ्या वेड्या मनाला

अजूनही नाही पटले तुझे जाने माझ्या वेड्या मनाला कधीतरी दिसशील माझ्या आतुरलेल्या नजरेला

का नाही कळले माझ्या वेड्या मनाला नाही काही उरले आता मला गमवायला

जीव झाला वेडापिसा तुला एकदा पाहायला काहीच कसे कळेना माझ्या वेड्या मनाला

तुजीच आस लागली माझ्या वेड्या मनाला आता तरी नजरेस पड शेवटच्या श्वासाला

No comments:

Post a Comment